शिर्डी : सीएनजी गॅस संपल्याने पंपासमोर पहाटेपासनच वाहनांच्या लांबच लांब रांगा.. - शिर्डीत सीएनजी गॅसचा तुटवडा
दिपावलीच्या सुट्टयांमुळे शिर्डीत आज साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना परतीच्या प्रवासातही मनस्ताप सहन करावा लागतोय. शिर्डी परिसरात एकच सीएनजी पंप आहे आणि त्यातच सीएनजी गॅस संपल्याने पहाटेपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा पंपासमोर लागल्या आहेत.
![शिर्डी : सीएनजी गॅस संपल्याने पंपासमोर पहाटेपासनच वाहनांच्या लांबच लांब रांगा.. cng shortage](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13567557-280-13567557-1636283173064.jpg)
शिर्डी (अहमदनगर) -दिपावलीच्या सुट्टयांमुळे शिर्डीत आज साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना परतीच्या प्रवासातही मनस्ताप सहन करावा लागतोय. शिर्डी परिसरात एकच सीएनजी पंप आहे आणि त्यातच सीएनजी गॅस संपल्याने पहाटेपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा पंपासमोर लागल्या आहेत.
शिर्डी शहराजवळील सावळीविहिर येथे एकमेव सीएनजी पंप आहे. त्यानंतर नासिक किंवा पुणे जिल्हयातील आळेफाटा येथे सीएनजी पंप आहेत. शिर्डीला दर्शन घेऊन परतीचा प्रवास करणाऱ्या भाविकांना आणि वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. पेट्रोलचे दर सीएनजी पेक्षा जास्त असल्याने सीएनजीसाठी पंपासमोर एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रवासाचे बजेट कोलमडत असल्याने भाविक तासनतास सीएनजीसाठी थांबून आहेत.