महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shirdi Sai Temple : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांनी आज शिर्डी येथे श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुजय विखे पाटील, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर उपस्थित होते. यावेळी ओम बिर्ला यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सत्‍कार केला.

Shirdi Sai Temple
ओम प्रकाश बिरला यांचे साईबाबांचे दर्शन

By

Published : May 11, 2023, 10:01 PM IST

ओम बिर्ला यांनी शिर्डीत साई समाधीचे घेतले दर्शन

अहमदनगर: आज दुपारी ओम बिर्ला यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचे आज सौभग्य मिळाले आहे. साईबाबांचा आशीर्वाद देशातील सर्व जनतेवर राहो. तसेच सर्वांचे कल्याण होवे. साईबाबांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आर्थिक समस्या दूर व्हाव्या तसेच देशाची अर्थिक उन्नती आणि प्रगती व्हावी, असे यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी साईबाबांच्या दर्शनानंतर साई मंदिरातील शेरे बुकाता आपला अभिप्राय नोदवला.

साई मूर्ति देवुन सत्कार केला:लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी आज दुपारी शिर्डीत येवून साईबाबा समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी बिरला यांनी साईबाबांची पाद्य पुजा आणि शिर्डी माझे पंढरपुर ही छोटी आरती केली. साईबाबांचा दर्शनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ओम प्रकाश बिरला यांचा शॉल, साई मूर्ति देवुन सत्कार केला. साईबाबांचे दर्शन घेवुन बिरला साईमंदिरा बाहेर आल्यानंतर, साईबाबांच्या गुरुस्थानचेही मनोभावे दर्शन यावेळी बिरला यांनी घेतले आहे. मंदिर परिसरात उभे असलेल्या काही भाविकांची बिरला यांनी भेट घेवुन चर्चाही केली.



खासदार सुजय विखे पाटीलही उपस्थित:दरम्यान , साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख़्य कार्यकारी अधिकारी तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर आणि शिर्डी ग्रामस्थ सुजीत गोंदकर व भाजपा कार्यकर्त्यांनी ओम बिरला यांचे पुष्पगुच्छा देवुन स्वागत केले आहे. यावेळी बिरला यांच्या बरोबर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटीलही उपस्थित होते.

शिर्डीसाठी 52 कोटींचा विशेष निधी मंजूर : शिर्डी शहर, मंदिर परिसर आणि परिक्रमा मार्गाचे सुशोभीकरण करून ठिकठिकाणी सौंदर्यस्थळे विकसित व्हावीत यासाठी राज्यशासनाकडून शिर्डीसाठी 52 कोटींचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मंदिरासमोरील पादचारी मार्ग, शहरातील मुख्य प्रवेश मार्ग, मुख्य चौक, मंदिर आवारातील पादचारी मार्ग आणि शिर्डी परिक्रमेच्या 14 किलोमीटर मार्गाच्या सौंदर्यीकरणाचे सुनियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील कामांना तीन महिन्यात सुरूवात होणार आहे.

हेही वाचा -

  1. Shirdi Beautification Plan शिर्डी शहराचं रूप आता पालटणार शहराच्या सौंदर्यकरणासाठी शासनाकडून 52 कोटींचा निधी मंजूर
  2. Shirdi Saibaba Temple शिर्डी साईबाबा मंदिरात हार फूल प्रसादावरील बंदी हटणार साई संस्थान समितीचा निर्णय
  3. Shirdi Sai Sansthan Defamation Message म्हणे साई संस्थानने हजला देणगी दिली अन् राममंदिराला नाकारली ही तर बदनामीच

ABOUT THE AUTHOR

...view details