महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उल्लेखनीय उपक्रम; शिर्डीतील 500 गोरगरीब कुटुंबीयांना मोफत किराणा साहित्याचे वितरण - कोरोना प्रसार

गोंदकर यांच्यातर्फे पाचशे कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ, एक किलो तूरदाळ, एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चहापत्ती आदी किराणा वस्तू देण्यात आल्या. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिर्डीतील पाचशे गोरगरीब, गरजवंत कुटुंबीयाना मोफत किराणा साहित्य वाटप
शिर्डीतील पाचशे गोरगरीब, गरजवंत कुटुंबीयाना मोफत किराणा साहित्य वाटप

By

Published : Mar 28, 2020, 10:14 AM IST

अहमदनगर - कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण देश 'लॉकडाऊन' करण्यात आला आहे. सर्व कामे जवळपास बंद झाल्याने तुटपुंजे उत्पन्न असलेल्यांसाठी उपासमारीचे दिवस आले आहेत. त्यांना मदत म्हणून किराणा साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. शिर्डीतील नगरसेवक सुजीत गोंदकर यांनी आज शिर्डीतील गोरगरीब आणि गरजू पाचशे कुटुंबीयाना या साहित्याचे वितरण केले.

शिर्डीतील पाचशे गोरगरीब, गरजवंत कुटुंबीयाना मोफत किराणा साहित्य वाटप
साईबाबांची शिर्डी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यामुळे येथील अनेकांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश बंद आहे. यामुळे सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी साईमंदिरही बंद ठेवण्यात आले आहे. येथे लोकांची वर्दळ पूर्णपणे थांबल्यामुळे या लोकांच्या पोटावर पाय आला आहे. अशी शेकडो कुटुंबे सध्या दोन वेळचे अन्न कसे मिळणार, या विवंचनेत आहेत.

अशा कुटुंबांना नगरसवेक गोंदकर यांनी किराणा साहित्याचे मोफत वाटप केले. गोंदकर यांच्यातर्फे पाचशे कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ, एक किलो तूरदाळ, एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चहापत्ती आदी किराणा वस्तू देण्यात आल्या. यामुळे या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशाच प्रकारे सर्वच नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील गरजूंना सहाय्य केले तरी अनेक कुटुंबांना दोन वेळचे अन्न मिळू शकेल.

ABOUT THE AUTHOR

...view details