महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन लाखांची कर्जमाफी अपुरी; अनिल घनवट यांची टीका - महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजना

कर्जमाफीची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही शर्ती आणि अटी सांगितलेल्या नाहीत. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफीच्या अटी आणि शर्ती स्पष्ट झाल्यानंतर शेतकरी नक्कीच निराश होईल. त्यानंतर शेतकरी संघटना आंदोलनाचा निर्णय घेईल, असा इशारा अनिल घनवट यांनी दिला.

दोन लाखांची कर्जमाफी अपुरी
दोन लाखांची कर्जमाफी अपुरी

By

Published : Dec 21, 2019, 8:24 PM IST

अहमदनगर - हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने घोषित केलेली कर्जमाफी पुरेशी नसल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी केली.

दोन लाखांची कर्जमाफी अपुरी

हेही वाचा - एवढ्या कर्जमाफीवरच थांबणार नाही, शेतकरी चिंतामुक्त करणार - मुख्यमंत्री

कर्जमाफीची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही शर्ती आणि अटी सांगितलेल्या नाहीत. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफीच्या अटी आणि शर्ती स्पष्ट झाल्यानंतर शेतकरी नक्कीच निराश होईल. त्यानंतर शेतकरी संघटना आंदोलनाचा निर्णय घेईल, असा इशारा घनवट यांनी दिला. विदर्भातील काही शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होईल. संपूर्णपणे कर्जमाफी करण्याचे दिलेले आश्वासन सरकारने पाळले नाही, याबद्दल घनवट यांनी सरकारवर टीका केली.

ABOUT THE AUTHOR

...view details