महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीचा 'गड' शिवसेनेने राखला; सदाशिव लोखंडे सलग दुसऱ्यांदा खासदार

शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सदाशिव लोंखडे आणि काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांच्यामध्ये लढत होती.

विखेंच्या दुटप्पी भूमिकेनंतर कोण होणार शिर्डीचा दिल्लीतील कारभारी?

By

Published : May 23, 2019, 6:05 AM IST

Updated : May 23, 2019, 5:21 PM IST

अहमदनगर -शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोंखडे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला. पूर्वीपासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र यंदा शिवसेनेने या मतदारसंघावर 'भगवा' रोवला आहे.

LIVE UPADATE -

  • 11:30 - शिवसेनेचे सदाशिव लोखंडे 48 हजार 967 मतांनी आघाडीवर; काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे पिछाडीवर
  • 9:00 - सदाशिव लोखंडे 23 हजार मतांनी आघाडीवर, महाआघाडी भाऊसाहेब कांबळे पिछाडीवर
  • मतमोजणीला सुरूवात झाली असून थोड्याच वेळात पहिला कल येईल.

अहमदनगर - शिर्डी लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ही मतमोजणी महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसिंग कार्पोरेशनच्या गोडाऊनमध्ये होत आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी मतदारसंघात 64.54 टक्के मतदान झाले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून यावेळी एकूण 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पुर्वीचा कोपरगाव लोकसभा मतदारसंघ 2009 च्या पुनर्रचनेनंतर शिर्डी लोकसभा म्हणून अस्तित्वात आला. पूर्वीपासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, या निवडणुकीत युतीकडून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे, तर काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे हे मैदानात उतरले आहेत. मात्र, भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवत या निवडणुकीत रंगत आणली आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत या मतदारसंघाचे कोण नेतृत्व करणार हे काही तासातच स्पष्ट होईल.


श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शांत स्वभाव म्हणून ओळखले जाणाऱ्या भाऊसाहेब कांबळेंना यावेळी काँग्रेसकडून उमदेवारी दिली आहे. कांबळे राधाकृष्ण विखे पाटील गटाचे असले तरी ते सध्या बाळासाहेब थोरात यांच्या गटात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखेंना राष्ट्रवादी काँग्रेसने नगरची जागा त्यांच्यासाठी न सोडल्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यात राधाकृष्ण विखे पाटील जाहीर प्रचारापासून दुर राहील्याने थोरांताची साथ घेत कोरीपाटी असलेले कांबळे निवडणुकीत उतरले आहेत.


2014 ची परिस्थिती-
2014 च्या निवडणुकीत साईबाबा संस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी सदाशिव लोखंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी लोखंडे यांना 5 लाख 32 हजार 936 मते मिळाली होती. तर काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांना 3 लाख 33 हजार 014 मते मिळाली होती. 2014 च्या लोकसभेत या मतदारसंघात 63.80 टक्के मतदान झाले होते.

Last Updated : May 23, 2019, 5:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details