अहमदनगर- लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात सरकारने मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारी अनेक ठिकाणी मद्यविक्रीला सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक ठिकाणी मद्यच्या दुकानाबाहेर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. परिणामी राज्यात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाल्याच्या काही घटना समोर आल्या. मात्र, अहमदनगरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मंगळवारी दिवसभर मद्य विक्री सुरळीत सुरू होती.
अखेर उपवास संपला, अहमदनगरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मद्यविक्री - कोरोना विषाणू
राज्यात काही ठिकाणी लोकांनी वाईन शॉपच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने काही ठिकाणी तत्काळ मद्य विक्री बंद करावी लागली होती. त्यामुळे शेकडो तळीरामांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे नगरमध्ये हा अनुभव पाहता, राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी मद्य विक्री सुरु करताना नियोजन करत मद्य विक्रेत्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
राज्यात काही ठिकाणी लोकांनी वाईन शॉपच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने काही ठिकाणी तत्काळ मद्य विक्री बंद करावी लागली होती. त्यामुळे शेकडो तळीरामांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे नगरमध्ये हा अनुभव पाहता, राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी मद्य विक्री सुरु करताना नियोजन करत मद्य विक्रेत्यांना योग्य त्या सूचना दिल्या. त्याबरोबरच तळीरामांनीही या सूचनांचे काटेकोर पालन केले. त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यात मंगळवारी मद्य दुकानांसमोर गर्दी असली तरी नियम पाळत तळीरामांनी दारु खरेदी केली.