महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! आईच्या कुशीतील बाळ बिबट्याने नेले हिसकावून; आईची झुंज अपयशी, मुलाचा मृत्यू - बिबट्याची शिकार

शिरापूर येथे एका पाच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळीच्या सुमारास ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी या मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बेपत्ता मुलगा
बेपत्ता मुलगा

By

Published : Oct 30, 2020, 6:58 AM IST

Updated : Oct 30, 2020, 12:26 PM IST

अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील मढी, केळवंडीनंतर आता शिरापूर येथील पाच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळीच्या सुमारास ही घटना घडली. वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी सकाळी मुलाचा मृतदेह सापडला आहे. पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगर रांगाच्या परिसरात मढी, वृद्धेश्वर, शिरापूर, केळवंडी आणि माणिकदौंडी आदी परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत निर्माण केली आहे.

आईच्या कुशीतील बाळ बिबट्याने नेले हिसकावून

आईची झुंज अपयशी...

संजय मुरलीधर बुधवंत यांची पत्नी आपल्या पाच वर्षाच्या मुलाला घेवून पडवीत बसली होती. त्यादरम्यान बिबट्याने झडप टाकून आईच्या मांडीवर असलेले बाळ उचलून नेले. डोळ्या समोर पोटच्या मुलाला बिबट्या घेवून जात असल्याचे पाहुन आईने बिबट्याला पकडण्याचा अपयशी प्रयत्न केला. तिने बिबड्याची शेपटी पकडून त्याला अटकाव करण्याच प्रयत्न केला. पण तो निसटून गेला.

पंधरा दिवसात तीन बालकांचा मृत्यू...

मागील आठवड्यात मढी येथून एक व त्यानंतर केळवंडी येथून एक असे दोन बालकांना बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शिरापूर गाव हद्दीत देखील घटनेची पुनरावृत्ती झाली. तसेच नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्येही दोन चार वर्षीय मुलांना बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली होती.

आज पहाटे सापडला सार्थकचा मृतदेह...

गुरूवारी सायंकाळी बिबट्याने सार्थकला पळवून नेले होते. त्यानंतर त्याचा शोध घेणे सुरू होते. वनविभागातील कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांनी शोधमोहिम चालवली होती. अखेर आज (शुक्रवारी) त्याचा मृतदेह एका झुडपात आढळून आला. बिबट्याने मुलाला गंभीर दुखापती केल्या आहेत.

मुलाचा सापडलेला मृतदेह

वनविभागाविरोधात रोष...

दिवसाढवळ्या घरात शिरून लहान मुलांना बिबट्या पळवून नेत असल्याने नागरिकांमध्ये चांगलाच रोष आहे. दररोजच्या घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र वनविभागाकडून ठोस पाऊले उचलले जात नाही. संपूर्ण यंत्रणा कामी लागूनही बिबट्याला पकडण्यात अपयश येत आहे. त्यामुळे वनविभाग अजून किती बळी जाण्याची वाट पाहत आहे, अशा तीव्र भावना नागरिकांच्या आहे.

Last Updated : Oct 30, 2020, 12:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details