अहमदनगर -श्रीगोंदा तालुक्यातील राजापुरात रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी लावलेल्या जाळीत बिबट्या जेरबंद झाल्याची घटना समोर आली आहे. येथील शेतकऱ्यांना या जाळीत रानडुकारऐवजी बिबट्या अडकल्याचे दिसल्याने भीतीचे वातावरण तयार झाल आहे.
रानडुकरासाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्या जेरबंद, परिसरात भीतीचे वातावरण - अहमदनगर बिबट्या बातमी
शेतकऱ्यांना बिबट्या बरोबरच रानडुकरांचा मोठा त्रास होत होता. मंगलवाडी शिवारातील अशोक मांडगे आणि उल्हास मांडगे या शेतकऱ्यांनी रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी शेताच्या कडेला जाळीचे कंपाऊंड केले होते. या जाळीच्या कंपाऊंडमध्ये रानडुकरांच्या ऐवजी बिबट्याच जेरबंद झालाय.
श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. दोन दिवसापूर्वी मेंगलवाडी परिसरातील शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला होता. परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्या बरोबरच रानडुकरांचा मोठा त्रास होत होता. मंगलवाडी शिवारातील अशोक मांडगे आणि उल्हास मांडगे या शेतकऱ्यांनी रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी शेताच्या कडेला जाळीचे कंपाऊंड केले होते. या जाळीच्या कंपाऊंडमध्ये रानडुकरांच्या ऐवजी बिबट्याच जेरबंद झालाय. वन विभागाने बिबट्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे सांगितले. बिबट्या जेरबंद झाल्याची समजताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे, तरीही नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे.