अहमदनगर- श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावात भरदिवसा बिबट्या मोकळ्या रानात बसलेला दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोकळ्या रानात बिबट्याचा वावर; परिसरात दहशतीचे वातावरण - शिर्डी
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावात भरदिवसा बिबट्या मोकळ्या रानात बसला होता. यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेतात वावरणारा बिबट्या
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावात मोकळ्या रानात बिबट्याचा वावर
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील शेती महामंडळाच्या मोकळ्या रानात बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील जळकेवाडी ते पटेलवाडी परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर मुक्तसंचार असल्याने या भागात वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी करत आहेत. रस्त्याने चार चाकी गाडीत जाणाऱ्या काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचे चित्र टिपले आहे. आता वनविभाग यावर काय उपाय करेल, याकडे येथील नागरीक आणि शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
Last Updated : Jul 3, 2019, 12:23 PM IST