अहमदनगर - 'जंगलबुक' सिनेमात मोगली आणि बगिराची मैत्री पाहून दर्शकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. शिर्डी जवळ शिर्डी-शिंगवे मार्गावरील वस्तीवर असाच एक बिबट्या मुलांसोबत खेळताना दिसतो.
जिल्ह्याच्या उत्तर भागात खाण्यासाठी आणि राहण्यासाठी मुबलक प्रमाणात असल्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या जास्त आहे. दररोज बिबट्याने हल्ला केल्याचा किंवा बिबट्या नजरेस पडल्याची बातमी मिळते. बिबट्या पाळीव प्राण्यांवर आणि मनुष्यावर हल्ला करत असल्याने ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत आहे. मात्र, शिर्डीजवळच्या वस्तीवर एका बिबट्याच्या पिल्लाचा लहान मुलांचा लळा लागला आहे. वस्तीवर बिबट्याचे एक पिल्लू दररोज येते आणि लहान मुलांसोबत मनसोक्त खेळते. ही मुलेही त्याला मित्राप्रमाणे गोंजारतात, त्याच्या सोबत खेळतात आणि त्याची काळजी घेतात. या मुलांनी त्याचे नाव 'बगिरा' ठेवले आहे.