अहमदनगर - संगमनेर व अकोले तालुक्यात बिबट्यांचा मोठा संचार वाढण्याबरोबर हल्लेही वाढत आहेत. संगमनेर तालुक्यातील सायखिंडी शिवारातील जीवदया पांजरपोळच्या आवारात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गायीच्या वासराला फाडत ओढून घेऊन जात असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वासराला फाडत बाहेर ओढून नेताना बिबट्या झाला सीसीटीव्हीत कैद, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण - ahmednagar breaking news
संगमनेर व अकोले तालुक्यात बिबट्यांचा मोठा संचार वाढण्याबरोबर हल्लेही वाढत आहेत. सायखिंडी शिवारातील जीवदया पांजरपोळच्या आवारात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गायीच्या वासराला फाडत ओढून घेऊन जात असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी अकोले तालुक्यातील झोळेकर वस्तीजवळ रात्री संतोष कारभारी गांवडे (वय 45 वर्षे) हे शेतमजूर शेतातील काम संपवून घरी जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील धुमाळवाडी, धामणगाव या गावांत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे शेळ्या, मेढ्यांवर हल्ले सुरुच आहेत. त्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अद्याप यश आलेले नाही. त्या बिबट्याने वन विभागाच्या पिंजऱ्याजवळ येऊन चकवा दिल्याचा व्हिडिओ ताजा असतानाच संगमनेर तालुक्यातील बिबट्याचे मनुष्य आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरू आहेत. संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील जीवदया पांजरपोळच्या आवारात बिबट्याने प्रवेश करत एका कालवडीचा फडशा पाडल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या गोशाळेत मोठ्या प्रमाणात जनावरे आहेत. त्यामुळे त्यांची सैरक्षणाची काळजी संस्था चालकांना पडली आहे.
हेही वाचा -सहकार मंत्रालयाची स्थापना करून राज्यातील सहकारी चळवळीवर नियंत्रण?