महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मामा-मामीने मोठ्या धाडसाने भाच्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवले

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात चार दिवसांपूर्वी देडगावात एका बिबट्याला वनविभागाने जेरबंद करण्याची घटना ताजी असताना, आता महालक्ष्मी हिवरे येथील या प्रकाराने परिसरातील नागरिक चिंतातूर झाले आहे.

leopard attack on boy in Ahmednagar
बिबट्याचा हल्ला अहमदनगर

By

Published : Jul 4, 2020, 7:20 PM IST

नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे शुक्रवारी मामा-मामी बरोबर शेतात गेलेल्या भाच्यावर उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. अशात मामा आणि मामीने मोठ्या हिंमतीने आणि धाडसाने बिबट्याच्या जबड्यातुन भाच्याला सोडवले. मात्र, बिबट्याने थेट माणसावरच हल्ला केल्याने सारे गाव हादरले असून सदर बिबट्याला पकडण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात चार दिवसांपूर्वी देडगावात एका बिबट्याला वनविभागाने जेरबंद करण्याची घटना ताजी असताना, आता महालक्ष्मी हिवरे येथील या प्रकाराने परिसरातील नागरिक चिंतातूर झाले आहे.

अहमदनगरमध्ये बिबट्याचा अकराव वर्षीय मुलावर हल्ला...

हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष: विद्यार्थी गळती रोखण्यासाठी शिक्षकाने फुलवली शाळेच्या आवारत शेती; स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांना दिला रोजगार

आजिनाथ रभाजी सांगळे हे त्यांच्या पत्नीसह त्यांच्याकडे शिक्षणासाठी असलेला भाचा अभय रामराव शिरसाट (11) याला बरोबर घेऊन जनावरांसाठी चारा कापण्यास आपल्या शेतात गेले होते. मामा-मामी गवत कापत असताना भाचा अभय हा त्यांच्या पाठीमागे गवत गोळा करत होता. त्यावेळी लगतच्या उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने अचानक अभयवर झडप घातली. त्यामुळे अभय मोठ्याने ओरडला. त्याचा आवाज ऐकूण मामा आणि मामीने पाठीमागे पाहिले असता भाच्याला बिबट्याने पकडल्याचे दिसले. त्यांनी कोणताही विचार न करता मोठ्या धाडसाने अभयला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.

त्यावेळी त्या बिबट्याने अभयच्या मामावर देखील हल्ला चढवला. परंतु, त्यांनी प्रसंगावधान बाळगून आपल्या हातातील विळ्याने बिबट्यावर पलटवार केला. त्याचवेळी अभयच्या मामी रेणुका यांनी अभयच्या पायाला धरुन ओढले. या आरडा-रड्याने शेजारी असणारे नागरिका त्यांच्या दिशेने धावले. त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. या घटनेत अभय गंभीर जखमी झाला असून त्याचे मामा आजिनाथ सांगळे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details