महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सॉर्टेड सिमेनमध्ये भेसळ रोखण्यासाठी कायदा आणणार - दुग्धविकास मंत्री सुनील केदार - Bhausaheb Thorat

संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या राजहंस दूध संस्थेच्या मिल्क पावडर प्लँटचे उद्धाटन तसेच स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या ४० फुटी तैल‌ चित्राचे मंत्री सुनिल केदार यांचे हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी सॉर्टेड सिमेनमध्ये भेसळ रोखण्यासाठी कायदा आणणार असल्याचे सांगितले.

Legislation will be enacted to prevent adulteration in sorted semen -  Dairy Development Minister Sunil Kedar
सॉर्टेड सिमेनमध्ये भेसळ रोखण्यासाठी कायदा आणणार - दुग्धविकास मंत्री सुनील केदार

By

Published : Nov 9, 2021, 5:00 AM IST

Updated : Nov 9, 2021, 6:10 AM IST

अहमदनगर - खाजगी कंपन्यांकडून सॉर्टेड सिमेनमध्ये भेसळ होत असल्याने शेतकऱ्यांना दगा फटका होतोय. यासंदर्भात लवकरच कायदा करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी आज संगमनेर येथे दिले आहे.

सॉर्टेड सिमेनमध्ये भेसळ रोखण्यासाठी कायदा आणणार - दुग्धविकास मंत्री सुनील केदार

'चीज आणि दुधाचे वेगवेगळ्या रंगात वर्गीकरण करणार'

संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या राजहंस दूध संस्थेच्या मिल्क पावडर प्लँटचे उद्धाटन तसेच स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या ४० फुटी तैल‌ चित्राचे मंत्री सुनिल केदार यांचे हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना केदार यांनी दुधाच्या‌ गुणवत्ते संदर्भात तडजोड केली जाणार नाही. व्हिजेटेबल ऑईल चीज आणि दुधापासून बनवलेल्या चिजचे वेगवेगळ्या रंगात वर्गीकरण करण्याचा मनोदय व्यक्त केला. सत्तेसाठी जिल्ह्यातील मोठे नेते कॉंग्रेसमधून भाजपात गेले. अशा अडचणीत जिल्ह्यातील नेते बाळासाहेब थोरातांनी पक्ष सांभाळला अशी टिका मंत्री सुनील केदार यांनी विखे पाटलांचे नाव घेता केली आहे.

'केंद्राच्या चुकीच्या आयात धोरणाने दूध भुकटीचे भाव कोसळले'

कोविड काळात दुधाची मागणी घटली असताना १० लाख लिटर दुधापासून पावडर बनवण्याचा विक्रम दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी केला. त्यामुळे दूध उत्पादकांचे नुकसान टळले. ३५० कोटी रुपये त्यासाठी खर्च झाले. केंद्राच्या चुकीच्या आयात धोरणामुळे दूध भुकटीचे भाव कोसळले. सॉर्टेड सिमेनच्या भेसळी विरोधात कठोर पावले उचलणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

हेही वाचा -दिवाळीची खरेदी करून परतताना भीषण अपघातात तीन मुलींसह चार जण ठार

Last Updated : Nov 9, 2021, 6:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details