अहमदनगर - संपूर्ण देशभरात लक्ष्मीपूजन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे. शिर्डी साईबाबा समाधी मंदिरातही लक्ष्मीपूजन करण्यात आले आहे. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांच्या हस्ते सहपत्नीक साई मंदिरात संस्थानच्या विविध विभागातील वही (चोपडी) पूजन तसेच साईबाबा संस्थानचे जमा असलेले सोने, चांदी, पैसे आणि लक्ष्मी यांची पूजा करण्यात आली.
लक्ष्मीपूजनादिवशी शिर्डीच्या साईमंदिरात मोठा उत्सव हेही वाचा - शेतकऱ्यांना औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करावे, आमदार सावरकरांनी कृषी अधिकाऱ्यांना केल्या सूचना
दिवाळी असल्याने देश भरातून हजारो श्रद्धाळू भाविक शिर्डीमध्ये आले असून आज साई समाधीवर नतमस्तक होत आहेत. आपले संपूर्ण जीवन फकीर म्हणून व्यतीत करणाऱ्या शिर्डी साईबाबांना रविवारी सुवर्णांनी सजवण्यात आले. संपूर्ण साई समाधी मंदिराला तसेच द्वाराकामाई चावडी गुरुस्थान या सर्व मंदिरांना विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलानी सजवण्यात आले आहे. विविध प्रकारची रोषणाईही करण्यात आली आहे.
हेही वाचा - ११ हजार रुपये किलोची मिठाई खरेदीसाठी ठाण्यात झुंबड