महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी सेवा केंद्रावर युरीया खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी झुंबड - युरीया खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी झुंबड

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे युरीया खतासाठी शेतकऱ्यांची कृषीसेवा केंद्रा समोर आज सकाळपासुन मोठ्या प्रमाणात गर्दी झालीय. सध्या शेतीसाठी खतांची आवश्यकता असल्याने शेतकरी खत खरेदीसाठी गर्दी करत आहेत. एकीकडे बांधावर खते आणि युरीया उपलब्ध करून देऊ असं म्हणणाऱ्या सरकारकडून कृषी केंद्रावरदेखील वेळेत खते, औषधे पोहोचत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

large-rush-of-farmers-to-buy-urea
युरीया खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी झुंबड

By

Published : Jul 22, 2020, 1:29 PM IST

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे युरीया खतासाठी शेतकऱ्यांची कृषीसेवा केंद्रा समोर आज सकाळपासुन मोठ्या प्रमाणात गर्दी झालीय. सकाळी सहा वाजल्यापासून शेकडो शेतकरी दुकानांसमोर रांगा लावून दाटीवाटीत उभे होते. एका युरीयाच्या गोणीसाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांवर तासनतास रांगेत उभ रहाव लागतय. काही ठिकाणी तर सकाळपासूनच रांगा लागल्याच दिसून येतंय. अनेक ठिकाणी दुकानावर होणारी गर्दी कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरु शकते.

कृषी सेवा केंद्रावर युरीया खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी झुंबड उडाल्याच दिसून येतंय. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे युरीया खतासाठी शेतकऱ्यांची कृषीसेवा केंद्रा समोर आज सकाळपासुन मोठ्या प्रमाणात गर्दी झालीय. सकाळी सहा वाजल्यापासून शेकडो शेतकरी दुकानांसमोर रांगा लावून दाटीवाटीत उभे होते. सध्या शेतीसाठी खतांची आवश्यकता असल्याने शेतकरी खत खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

दुकान चालकांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सोसावा लागतोय. एकीकडे बांधावर खते आणि युरीया उपलब्ध करून देऊ असं म्हणणाऱ्या सरकारकडून कृषी केंद्रावरदेखील वेळेत खते, औषधे पोहोच होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. तासनतास प्रतीक्षा केल्यानंतर केवळ एक गोणी युरीया शेतकऱ्यांना दिला जातो. खरीपांच्या पिकांसाठी युरीयाची गरज असून आवश्यक साठा सर्वत्र उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details