अहमदनगर- संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटत आज (रविवारी) पुन्हा एकदा दरड कोसळली. त्यामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक काही तासांपासून ठप्प आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चंदनापुरी घाटात दरड कोसळली; नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प
सुदैवाने यावेळी कोणतेही वाहनं रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला. महामार्ग पोलीस आणि नागरीकांनी रस्त्यावर पडलेले दगड बाजूला काढणयाचे काम सुरु केले आहे. मात्र, हे दगड रस्त्यावर कोसळणे, नित्याची बाब झाली आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर असणाऱ्या चंदनापूरी घाटात सतत मोठ-मोठे दगड कोसळत आहेत. आजही मोठे दगड थेट महामार्गावर येवून पडले. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहनं रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला. महामार्ग पोलीस आणि नागरीकांनी रस्त्यावर पडलेले दगड बाजूला काढणयाचे काम सुरु केले आहे. मात्र, हे दगड रस्त्यावर कोसळणे, नित्याची बाब झाली आहे.
महामार्ग बनवताना मोठे डोंगर फोडून रस्ता बनवला खरा. मात्र, आता या रस्त्यालगत असणाऱ्या डोंगरावरून दरड कोसळत आहेत. डोळ्यांना हा परिसर नयनरम्य वाटत असला, तरी अशा प्रकारच्या दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना होवू शकते. त्यामुळे धोकादायक दरड लवकर हटवण्याची गरज आहे.