शिर्डी - साईबाबांच्या दर्शनाबरोबर साईबाबांचा बुंदी लाडू प्रसादही मिळावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाविक साई संस्थानकडे मागणी करत होते. भाविकांची ही मागणी आता पूर्ण झाली असून साईबाबा संस्थानने द्वारकामाई समोरील नाटयगृह येथे लाडू विक्री काऊंटर सुरू (Laadu prasad sale counter starts) केले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने काही अटी-शर्तीवर शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांसाठी (Shirdi sai temple reopen) खुले केले. मात्र अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता साईबाबा संस्थानचे साई प्रसादालय आणि भाविकांना साई संस्थानचा वतीने देण्यात येणारा लाडू प्रसाद बंद ठेवण्यात आलेला होता. साईबाबांच्या दर्शनाबरोबर साई साईप्रसादालय भोजनाकरीता सुरू करण्यात यावे तसेच साईबाबा संस्थानकडून भाविकांना देण्यात येणारा लाडू प्रसादही सुरू करण्याची मागणी भाविकांकडून साई संस्थानला करण्यात येत होती.
अखेर साई भक्तांची लाडू प्रसादासाठीची प्रतीक्षा संपली.. आजपासून साई संस्थानकाढून लाडू विक्री काऊंटर सुरू - शिर्डीचे साई मंदिर भक्तांसाठी खुले
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने काही अटी-शर्तीवर शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांसाठी खुले केले. साईबाबांच्या दर्शनाबरोबर साईबाबांचा बुंदी लाडू प्रसादही मिळावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाविक साई संस्थानकडे मागणी करत होते. भाविकांची ही मागणी आता पूर्ण झाली असून साईबाबा संस्थानने द्वारकामाई समोरील नाटयगृह येथे लाडू विक्री काऊंटर (Laadu prasad sale counter starts) सुरू केले आहे.
भाविकांच्या या मागणीनंतर 26 नोव्हेंबर पासून साईप्रसादालय भोजनासाठी सुरु करण्यात आल्यानंतर आता बुंदीलाडू प्रसादही देण्यासही आता सुरुवात झाली आहे. भाविकांचा आवडीचा लाडु प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या.
द्वारकामाई समोरील नाटयगृह येथे साई संस्थांकडून एक लाडू विक्री काऊंटर सुरू करण्यात आले असून टप्प्या-टप्प्याने इतर ठिकाणीही लाडू विक्री काऊंटर लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानकडून देण्यात आली आहे. एका लाडू पॉकेटमध्ये 3 लाडू असुन ना नफा ना तोटा या तत्वावर याची रुपये 25 प्रमाणे विक्री केली जाते. मात्र साईबाबा संस्थानकडून कोरोना आधी साई दर्शनानंतर भाविकांना लाईनमध्ये मोफत देण्यात येणारे बुंदी पॉकेटही साई संस्थाने लवकरात लवकर सुरू करावे अशीही मागणी आता भाविकांकडून केली जात आहे.