महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raid On Mawa Makers: मावा तयार करणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांचा छापा; 1 लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त - Raid On Mawa Makers

अहमदनगर मधील सुगंधी तंबाखू व सुपारी बारीक करण्याची मशीन कोतवाली पोलिसांनी आज जप्त केली आहे. शहरातील झेंडीगेट परिसरातील सैदु कारंजा मस्जीद जवळ ही कारवाई करण्यात आली. तसेच 1 लाख ३८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Raid On Mawa Makers
पोलिसांचा छापा

By

Published : Jul 20, 2023, 7:41 PM IST

अहमदनगर : मशीनद्वारे सुगंधी तंबाखू व सुपारी बारीक करून मावा तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला सूचना दिल्या आहेत. फयाज इलियास शेख (वय २१ वर्षे, रा.कोठला झोपडपट्टी, अहमदनगर), सुफीयान नासीर शेख (वय २० वर्षे, मुकुंदनगर, अहमदनगर) या दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झेंडीगेट परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधित तंबाखू व सुपारी बारीक करून प्रतिबंधित मावा विक्री केला जात असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना गुप्तबातमीदारामार्फत मिळाली होती.

हा मुद्देमाल जप्त :कोतवाली पोलिसांनी दोन पंचांसोबत २० जुलै २०२३ रोजी सापळा लावून छापा टाकला. या कारवाईत 1 लाख ३० हजार रुपये किमतीची सुपारी फोडण्याची लोखंडी मशीन, 3 हजार ६०० रुपये किमतीचे सुगंधी तंबाखूचे सिल्व्हर रंगाचे १८ पाकीट, 5 हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रीक वजन काटा असा 1 लाख ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

'या' अधिकाऱ्यांनी घेतला कारवाईत भाग:ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक मनोज कचरे, शाहीद शेख, रविंद्र टकले, दीपक रोहकले, सुमित गवळी, प्रमोद लहारे यांनी केली.

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : टायर, अ‍ॅल्युमिनिअम, मेटल आदी साहित्याआड करण्यात येत असलेल्या सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. शनिवारी रात्री दरम्यान पिंपळखुटी चेकपोस्टवर करण्यात आलेल्या कारवाईत ट्रक व तंबाखू असा एकूण 46 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलिसांनी ही कारवाई केली.

हेही वाचा:

  1. Twelve Robbers Caught : दरोड्याच्या तयारीत असलेले बारा दरोडेखोर जेरबंद
  2. Sambhajinagar Crime : संभाजीनगरमध्ये लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ: पोलिसांच्या उपाययोजना फेल?
  3. doctor killed his father : डॉक्टर मुलानेच केला बापाचा खून, आईने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details