शिर्डी (अहमदनगर) - कोरोनाच्या प्रसार टाळावा यासाठी शासनाने सर्वत्र टाळेबंदी केली आहे. या फटका गोर, गरिब, गरजू, मोजरमजुरांना होत आहे. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचीही दशा होत आहे. अशा अडीचशे कुटुंबीयांना येथील सुमित्रा कोते यांनी किराणाची मदत केली आहे.
शिर्डीच्या कोते परिवाराकडून अडीचशे जणांना किराणा वाटप - किराणा वाटप
कोरोनाने सर्वत्र थैमान घातला आहे. या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. यामुळे गोरगरीब जनतेचे मोठे हाल होत आहे. अशा 250 कुटुंबियांना मदत म्हणून शिर्डीतील सुमित्रा कोते यांनी किराणा वाटप केले.
किराणा मालचे वाटप करताना
माजी नगराध्यक्ष असलेल्या सुमित्रा कोते या सामाजिक भान ठेवत विविध सामाजिक उपक्रम राबवितात. तेच सामाजिक भान ठेवत अडीचशे कुटुंबीयांना पंधरा दिवस पुरेल इतका किराणा आणि जीवनावश्यक वस्तुंसह मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. मदत करताना त्या सर्वांना विनाकारण घराबाहेर पडू नका. घरात राहून स्वतः ची आणि परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा -शिर्डीतील साई कर्नाटक भवन, दत्त प्रतिष्ठान देतायेत रोज ४०० लोकांना भोजन...