शिर्डी : संपूर्ण देश भरात कोजागिरी पौर्णिमा ( Shirdi Kojagiri Pornima ) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. साईबाबाच्या शिर्डीतही ( Shirdi saibaba ) मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली आहे. पहाटच्या काकड आरती नंतर साईंच्या मुर्तीला मंगलस्नान घालण्यात आले असून साईंच्या मुर्तीला सोन्याच्या अलंकाराने सजवण्यात आल्याने साईबाबा साक्ष्यात कुबेराच्या रुपात दिसत होते.
Shirdi Kojagiri Poornima : साईबाबांच्या मंदिरात अशी साजरी झाली कोजागिरी पौर्णिमा
संपूर्ण देश भरात कोजागिरी पौर्णिमा ( Shirdi Kojagiri Pornima ) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. साईबाबाच्या शिर्डीतही ( Shirdi saibaba ) मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली आहे.
साईबाबा मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन : कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने साईबाबा समाधी मंदिर समोरील स्टेजवर कलाकारांच्या वतीने रात्री 7 ते 11 पर्यंत धार्मिक कार्यक्रम आयोजत करण्यात आला होता. तसेच रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत साईबाबा मंदिरात अभिषेक पूजा तसेच लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा करण्यात आली. रात्री 12 वाजता साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्याश्री बानायत आणि त्यांचे पती संजय धिवरे यांचा हस्ते चंद्र लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा होऊन दुधा मधे चंद्र पाहिल्यानंतर साईबाबाची शेजआरतीला सुरुवात झाली.
साई संस्थान काढुन 400 लिटर दुध: आरतीचा प्रसाद म्हणून सर्व साईभक्तांना आणि ग्रामस्थाना दुध देण्यात आलय. असे म्हंटल्या जाते की कोजागिरी म्हणजे शरद पौर्णिमा या दिवशी दुधात चंद्र पहिल्याने आरोग्य प्राप्ती होते. साईबाबाच्या अनुमतीने सुरु करण्यात आलेल्या कोजागिरी पौर्णिमाला आज पण साई संस्थान काढून मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येत आहे. कोजागिरी पौर्णिमा या दिवसाचे शिर्डी मधे एक वेगळेच महत्व आहे. साई संस्थान काढुन 400 लिटर दुध. केसर बदाम काजू या पासून बनावलेल्या दुधाचा प्रसाद बनवण्यात आला होता. हा प्रसाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थ लांबच लांब रागा करून उभे राहत आणि आपल्या साईचा प्रसाद घेतला.