शिर्डी शिर्डीच्या साईबाबा देवस्थानाचा कारभार पाहण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2004 साली एक कायदा तयार केला. विश्वस्त मंडळावर आपली राजकीय पकड मजबुत करण्याचा सरकारने प्रयत्न केला. मात्र, साई संस्थानावर विश्वस्त मंडळ नेमताना कायद्यानुसार नेमले जात नसल्याने शिर्डीतील शेळके कुटुंबीयांनी (shirdi shelake family) उच्च न्यायालयात धाव घेतली. आधी राजेंद्र शेळके यांनी दाखल केलेल्या याचीकेमुळे राज्य सरकारने नेमलेले विश्वस्त मंडळ अवघ्या एका दिवसात बरखास्त झाले होते. त्यानंतर आता राजेंद्र शेळके यांचे वडील उत्तम रंभाजी शेळके यांनी महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या विश्वस्त मंडळाच्या निवडीला आव्हान देत दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने(high court on shirdi trustees) हे विश्वस्त मंडळ बरखास्तीचा (Dissolution of Board of Trustees) निर्णय दिल्याची माहिती याचिकाकर्ते यांच्या वकील प्रदन्या तळेकर यांनी दिली आहे.
विश्वस्त समितीची रचना मोडीत शिर्डी संस्थानावरील शासननियुक्त व्यवस्थापन समितीची नेमणूक साईबाबा संस्थान विश्वस्त कायद्याच्या (Saibaba Sansthan Trustee Act) कलम ५ आणि २०१३ चे विश्वस्त नेमणूक नियमानुसार झालेली नाही. या समितीमध्ये आर्थिक व मागास प्रवर्गाचा प्रतिनिधी नाही. तसेच व्यापार, व्यवस्थापन, बिझनेस मॅनेजमेंट प्रवर्ग, आरोग्य आणि औषधी तसेच ग्रामविकास प्रवर्गातील प्रतिनिधी नाही. मूळ नियमानुसार संस्थानचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह एकूण १७ जणांची समिती असावयास हवी. मात्र शासनाने सुरवातीला ११ सदस्य आणि शिर्डीचे नगराध्यक्ष पदसिद्ध सदस्य अशा १२ सदस्यांचीच कार्यकारिणी कार्यरत होती.