महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्ता आणि पैशासाठी केजरीवाल काँग्रेससोबत जाऊ पाहताहेत - अण्णा हजारे - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

देशात अनेक पक्ष भ्रष्टाचाराच्या मार्गाने सत्तेत असताना अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाकडून मला खूप मोठ्या अपेक्षा होत्या. या पक्षाच्या माध्यमातून देश बदलेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

अहमदनगर

By

Published : May 4, 2019, 8:08 AM IST

अहमदनगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष काँग्रेससोबत निवडणुका लढवणार असल्याच्या येत असणाऱ्या बातम्यांवर अण्णा नाराज आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

भ्रष्टाचारामुळे या पक्षाच्या विरोधात एक मोठे आंदोलन आम्ही केले आणि या आंदोलनात स्वतः केजरीवाल सहभागी झाले होते. तेच केजरीवाल आज मुख्यमंत्री झाल्यानंतर सत्ता आणि पैशासाठी काँग्रेससोबत जात असल्याचे पाहून दुःख होत असल्याचे अण्णांनी म्हटले आहे. कधी काळी मला गुरू मानणारे आज मला विसरले याची खंतही अण्णांनी व्यक्त केली. मात्र, हे सांगताना अण्णांनी मला संपूर्ण देश ओळखतो, त्यामुळे एखाद्या व्यक्तीने मला विसरले तर काही फरक पडत नाही, असेही सांगितले.

सत्ता आणि पैशासाठी ज्या पक्षाविरोधात आंदोलन केले त्यांच्यासोबत ते जात असल्याबद्दल वाईट वाटत असल्याचे अण्णांनी सांगितले. इतर अनेक पक्ष भ्रष्टाचाराच्या मार्गाने सत्तेत असताना अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाकडून मला खूप मोठ्या अपेक्षा होत्या. या पक्षाच्या माध्यमातून देश बदलेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details