अहमदनगर - 'स्वच्छ सर्वेक्षण 2019' अंतर्गत सुरू असलेल्या श्रमदान पद्धतीच्या 'स्वच्छ कर्जत अभियाना'त जिल्ह्यात विविध सामाजिक संघटना दररोज सकाळी श्रमदान करून स्वच्छता करत आहेत. सदर अभियानाच्या 71व्या दिवशी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या अभियानात स्वतः उतरून झाडलोट केली. 70व्या दिवशी उपजिल्हा रुग्णालय आणि 71व्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये कर्जत जामखेडचे आमदार पवार हे सहभागी झाले व त्यांनी एक तास श्रमदान करून स्वच्छता केली.
आ. रोहित यांनी हाती घेतला झाडू, कुदळ-फावडे..
हातात झाडू घेऊन रोहित पवार यांनी अनेक दिवसापासून पडलेला कचरा बाहेर काढला, तर काही ठिकाणी हातात कोयता घेऊन वाळलेले बाभूळ आणि झुडपेही तोडली. याशिवाय बाजार समितीच्या परिसरात फिरून पाहणी केली. बाजार समिती तालुक्याची कामधेनू ठरू शकते आणि ही संस्था चांगली चालली तर बाजारपेठ खेळती राहते. त्यामुळे या संस्थेकडे विशेष लक्ष देऊन येथील जागेचा योग्य वापर कसा करता येईल, याबाबत निर्णय घेऊ असेही यावेळी सांगितले.
गेल्या 71 दिवसांपासून स्वच्छता अभियान..