शिर्डी-अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणाऱ्या भंडारदरा धरणाच्या ( Bhandardara Dam ) पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे भंडारदरा परिसरात निसर्ग सौंदर्य खुलले आहे. कळसूबाई शिखरावरही जोरदार पाऊस ( Heavy rain fell on Kalsubai peak) सुरू असून हे पाणी पायथ्याशी असलेल्या कृष्णवंती नदीला ( Krishnavanti river ) येऊन मिळते. सुट्टीचा दिवस असल्याने काल शनिवारी सकाळी अनेक पर्यटक या परिसरात पर्यटनासाठी आलेले होते. या पर्यटकांमध्ये पुरुषांसह महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता. गिर्यारोहणासाठी ( Mountaineering ) गेलेले अनेक पर्यटक शिखर उतरून खाली येत असतानाच पावसाचा जोर वाढला आणि कृष्णवंती नदीला पूर आला. कसेबसे शिखराच्या पायथ्याशी पोहचलेले हे पर्यटक नदीच्या पाण्यामुळे बारी व जहागीरवाडी या गावांनामध्ये पोहचू शकत नव्हते. काही गिर्यारोहकांनी पोलिस हेल्पलाईन ( Police helpline ) क्रमांक 112 वर फोन करत पुराच्या पाण्यामुळे अडकल्याची माहीती दिली.
Kalsubai Peak : कळसुबाई शिखरावर अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका - Kalsubai Shikhar
पावसाळा सुरु झाल्यानंतर पर्यटनाकडे ( Tourism ) सगळ्याचा ओघ वाढलाय. मात्र, पर्यटनस्थळी आता जातांना सर्व सुरक्षेचे उपाय करुन जाणे गरजेचे आहे. अकोले तालक्यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई शिखराच्या ( Kalsubai peak ) पायथ्याशी असलेल्या कृष्णवंती नदीला ( Flood of Krishnavanti river ) आलेल्या पुरामुळे काल शनिवारी अनेक पर्यटक अडकले होते. पोलिस आणि स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून सर्व पर्यटकांची सुखरूप ( Safe release of tourists ) सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान, राजुर पोलिस स्टेशनला माहिती प्राप्त होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळावर हजर झाले. तोपर्यंत जहागिरदार वाडीतील काही व्यवसायीक, गाईड, तसेच गावकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने नदीच्या पलिकडे अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली होती.काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. संध्याकाळपर्यंत सर्व गिर्यारोहकांची सुखरुप सुटका करण्यात पोलीस तसेच स्थानिकांना यश आले आहे.
हेही वाचा -शिवसेनेच्या आमदारांना विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा; आदित्य ठाकरेंना नोटीस नाही...