अहमदनगर (अकोले) - अकोले तालुक्यातील परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे तांडव सुरु असून हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर वाढला आहे Damage due to rain in Ahmednagar district काल मध्यरात्री झालेल्या पावसाने सावरकुटे येथील जोगेश्वरी विद्यालय भुईसपाट झाले आहे सुदैवाने येथे जीवितहानी टळली आहे
नवीन वर्गखोल्या उभारल्या अकोले तालुक्यातील सावरकुटे येथील स्व बाबुराव सखाराम बोऱ्हाडे बी एस बी एज्युकेशनल संस्था जोगेश्वरी विद्यालयाची इमारत गुरुवारी रात्री भुईसपाट झाली त्यामध्ये शाळेची भिंत पडून बाकांचे नुकसान झाले उल्हासनगर या संस्थेच्या जोगेश्वरी विद्यालय सावरकुटे हे वर्षानुवर्षे समाज मंदिर मारुती मंदिर तसेच खासगी घरांमध्ये भरत होते मागील वर्षी संस्थेच्या व गावकऱ्यांच्या मदतीने आठवी नववी व दहावीच्या वर्गासाठी नवीन वर्गखोल्या उभारल्या आहेत