महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'माझे वक्तव्य विवादित नाही, जे इतिहासात आहे तेच जनतेसमोर मांडतोय' - स्वातंत्रवीर सावरकर

तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता हे मी केलेले भाष्य विवादित नसून इतिहासात जे लिहिलेले आहे, अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

By

Published : Jan 21, 2020, 11:14 PM IST

अहमदनगर- 'तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता, हे मी केलेले भाष्य विवादित नसून इतिहासात जे लिहिलेले आहे, ते मी जनतेसमोर मांडत आहे,' अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

सीएए कायद्याला विरोधात ठाण्यात आयोजित सभेत जितेंद्र आव्हाड यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करत तुमचा बाप इंग्रजांचे तळवे चाटत होता असे वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्यावर भारतीय जनता पक्ष तक्रार करणार असल्याचे आव्हाड यांना विचारले असता, त्यांनी ही प्रतिक्रिया अहमदनगर येथे दिली.

हेही वाचा - अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळामध्ये भ्रष्टाचार झाला.. रोहित पवारांची चौकशीची मागणी

दरम्यान, ठाण्यापाठोपाठ अहमदनगरमध्ये देखील आव्हाड यांनी हेच वक्तव्य केले. 'माझे हे भाष्य विवादित नाही,' असे जितेंद्र म्हणाले. 'आरएसएसने एक स्वातंत्र्य सेनानी जन्माला घातला होता. त्यावेळी 1942 च्या आंदोलनाला विरोध कोणी केला होता. महात्मा गांधींना विरोध कोणी केला होता, चातुर्वर्ण्याला समर्थन देत कम्युनिस्ट आणि मुस्लिमांशी लढायला कोणी सागितले होते, ते आम्ही तर नाहीच सांगितले. मग हे इंग्रजांचे तळवे चाटणे नाही तर काय आहे,' असा उलट प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.

'1942 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्य मागत होता, तेव्हा त्याला विरोध कोणी केला होता हे सगळे इतिहास सांगत आहे. जितेंद्र आव्हाड नाही. जितेंद्र आव्हाड फक्त इतिहासात लिहिलेले जनतेसमोर मांडत आहे,' अशी प्रतिक्रया आव्हाड यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - 'साई जन्मस्थळाबाबतच्या विधानावर टिप्पणी करण्याएवढा मी मोठा नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details