महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोरट्यांनी साधला डाव... शस्त्राच्या धाकाने चाळीस किलो चांदी लंपास - robbery in ahmednagar

गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असताना संंतोष कुलथे यांच्याकडील सुमारे चोवीस लाखांची (40 किलो) चांदी अज्ञात सहा लुटारूंनी पळवली. कोयत्याचा धाक दाखवून चोरी केल्याचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

ahmednagar crime news
दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असताना चोरट्यांनी साधला डाव...चाळीस किलो चांदी लंपास

By

Published : Oct 9, 2020, 1:48 PM IST

अहमदनगर -राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे सराफ संतोष मधुकर कुलथे यांच्या सराफाला गंडा घालण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्याकडील सुमारे चोवीस लाखांची (40 किलो) चांदी अज्ञात सहा लुटारूंनी पळवली. कोयत्याचा धाक दाखवून चोरी केल्याचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असताना चोरट्यांनी साधला डाव...चाळीस किलो चांदी लंपास

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील वेताळबाबा चौकातील भरवस्तीत संतोष कुलथे यांचे कुलथे ज्वेलर्स हे दुकान आहे. सायंकाळी सात वाजता ते दुकान बंद करत असताना चोरट्यांनी डाव साधला.

चाळीस किलो चांदीचे दागिने तीन बॅगांमध्ये भरून दुकानातील एका कारागिराच्या मदतीने त्यातील दोन बॅग गाडीत ठेवल्या. तिसरी बॅग आणण्यासाठी संतोष दुकानाकडे गेले असतानाच तेथे दुचाकींवरून आलेल्या अज्ञात सहा जणांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली. तर काहींनी कारची पुढची काच फोडून आतील दोन्ही बॅग काढून घेऊन पसार झाले आहे. यावेळी वेताळबाबा चौकात अनेक लोक होते. मात्र काही कळण्याच्या आतच हे चोर लंपास झाले. संतोष यांनी आरडओरडा केल्याने हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला.

लोणी पोलिसांना संबंधित प्रकार कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. सध्या मास्क वापरणे सक्तीचे असल्याने गुन्हेगारांच्या ते पथ्यावर पडत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details