अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील 'श्री क्षेत्र भगवानगड' येथे जय भगवान महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी, भटके विमुक्त हक्क परिषदेचा राज्यस्तरीय मेळावा औरंगाबाद येथे घेण्यावर चर्चा झाली.
'ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या' - ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण
पाथर्डी तालुक्यातील 'श्री क्षेत्र भगवानगड' येथे जय भगवान महासंघाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यता यावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, आनंद लहामगे, रमेश सानप, बाबासाहेब वाघ, प्रल्हाद कीर्तने, महेश दौंड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण सरकारने द्यावे, महाराष्ट्रातील लोकसेवा आयोग व सरकारी भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र सरकारने ऊसतोड मजूर कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास जानेवारीपासून कोयता बंद आंदोलन करण्याची भूमिका जय भगवान महासंघाने घेतली आहे.