महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डी साईबाबा मंदिरात चांदीच्या पाळण्यात दत्त मूर्ती ठेवून जन्मोत्सव साजरा

देशभरात आज दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जात आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही हा उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. साईबाबांना श्री. दत्त अवतार मानत आज हजारो भक्तांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले.

Datta Jayanti Shirdi News
शिर्डी साई बाबा मंदिर

By

Published : Dec 29, 2020, 10:41 PM IST

अमदनगर -देशभरात आज दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जात आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही हा उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. साईबाबांना श्री. दत्त अवतार मानत आज हजारो भक्तांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले.

शिर्डी साईबाबा मंदिरात चांदीच्या पाळण्यात दत्त मूर्ती ठेवून जन्मोत्सव साजरा

हेही वाचा -'केंद्र सरकारकडून आश्वासनांची पूर्तता नाही; पुन्हा आंदोलन करणार'

आज साई मंदिरात किर्तन पार पडले. नतर संध्याकाळी ६ वाजता दत्त जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर धूप आरतीला सुरुवात झाली. साई समाधी मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्री. दत्त मूर्ती ठेवून दत्त जन्माचे किर्तन झाल्यानंतर जन्मोत्वस साजरा करण्यात आला. आज दिवसभर साई समाधीवर श्री. दत्त यांचा फोटो ठेवून त्यांची पूजा करण्यात आली. साई मंदिर परिसर, तसेच गुरुस्थान मंदिर, द्वारकामाई मंदिर, चावडी मंदिर, समाधी मंदिराला रंगेबीरंगी फुलांनी सजवन्यात आले.

दत्त जयंती निमित्ताने अशा प्रकारे आली साईबाबांना देणगी

आज दत्त जयंती निमित्ताने चंदीगढ येथील त्रुतीय पंथी समाज्याचा सोनाक्षी या साईभक्तानी साईबाबांना तब्बल 11 लाख रुपये रोख देणगी दिली. तसेच, दिल्ली येथील साईभक्त रंजनी डंग यांनी साई मंदिर परिसर, तसेच गुरुस्थान मंदिर, द्वारकामाई मंदिर, चावडी मंदिर, समाधी मंदिराला रंगेबीरंगी फुलांची सजावट करून साईबाबांप्रती असलेली श्रद्धा व्यक्त केली.

हेही वाचा -नगर: बस स्टँड परिसरात सोने चोरी करणारी टोळी गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details