अहमदनगर- संगमनेर तालुक्यात, हिवरगाव पावसा गावातील शेतकरी आप्पासाहेब गडाख यांच्या शेतामधे तीन वर्षीय नर जातीचा बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला आहे. बिबट्याला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हिवरगाव पावसा गावाजवळील विद्युत रोहित्रकाजवळ हा बिबट्या आढळून आला असून त्याच्या मानेला जखम झालेली होती. बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास येताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यात आढळला जखमी बिबट्या - ahamdnagar
हिवरगाव पावसा गावानजीकच्या विद्युत रोहित्रकाजवळ जखमी अवस्थेतील बिबट्या आढळून आला आहे.
शेतात आढळलेला जखमी बिबट्या
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्याला निंबाळे येथील रोपवाटिकेत आणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हातून त्यावर उपचार केले जात आहेत. दरम्यान वनविभागाचे अधिकारी यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.