शिर्डी (अहमदनगर) -देशातील दोन नंबरचे श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखला जाणारा शिर्डी साईबाबा संस्थानवर गेल्या चार दिवसापूर्वी नव्याने नेमलेले अकरा सदस्यांची नेमणुकीबाबत शासनाच्यावतीने न्यायालयात कोणतीही सूचना न देता परस्पर या विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे नवनियुक्त विश्वस्त मंडळाने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असा आदेश मुंबई खंडपीठाच्या औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. तो पर्यंत संस्थानचा कारभार तदर्थ समिती पाहणार असल्याचे आदेश उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान दिले असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने अँड अजिंक्य काळे यांनी दिली आहे.
साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाला आर्थिक, धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही - औरंगाबाद खंडपीठ - नव नियुक्त विश्वस्त मंडळ
नव्याने नेमलेले अकरा सदस्यांची नेमणुकीबाबत शासनाच्यावतीने न्यायालयात कोणतीही सूचना न देता परस्पर या विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे नवनियुक्त विश्वस्त मंडळाने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असा आदेश मुंबई खंडपीठाच्या औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. तो पर्यंत संस्थानचा कारभार तदर्थ समिती पाहणार असल्याचे आदेश उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान दिले असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने अँड अजिंक्य काळे यांनी दिली आहे.
विश्वस्त मंडळ
Last Updated : Sep 21, 2021, 7:40 PM IST