शिर्डी (अहमदनगर) -अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरात असलेल्या हरिश्चंद्रगड अभयारण्यात शेकरुच्या संख्यते यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. शेकरुची संख्या वाढल्याने वन्यप्रेमींकडून समाधान व्यक्त होत आहे. राज्यात दरवर्षी वन्यप्राण्याची गणना केली जाते. अहमदनगरच्या वन विभागाकडून कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात यावर्षी शेकरुंची गणती करण्यात आली. त्यात 97 शेकरू आढळून आले आहे. या शेकरूंच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा दीडपटीने वाढ झाल्याचे नुकत्याच झालेल्या गणतीनुसार समोर आल्याच वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले आहे. या अभयारण्यात शेकरूंची 396 घरटी आढळली आहेत. मात्र त्यांची संख्या 97 आहे.
शेकरुची वैशिष्ट्ये
हरिश्चंद्रगड अभयारण्यात शेकरुंच्या संख्येत वाढ; वन्यप्रेमींकडून समाधान - शेकरुंच्या संख्येत वाढ
अहमदनगरच्या वन विभागाकडून कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात यावर्षी शेकरुंची गणती करण्यात आली. त्यात 97 शेकरू आढळून आले आहे. या शेकरूंच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा दीडपटीने वाढ झाल्याचे नुकत्याच झालेल्या गणतीनुसार समोर आल्याच वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले आहे.
वजन दोन ते अडीच किलो, लांबी अडीच ते तीन फूट असलेल्या शेकरूंची डोळे गुंजीसारखे लाल असतात. त्याला मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांब शेपूट असते. शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरू झाडाच्या बारीक फांद्यावर सहा ते आठ घरटी तयार करते. 15 ते 20 फुटांची लांब उडी मारू शकते. विविध फळे व फुलांतील मध हे त्याचे खाद्य असते. महाराष्ट्रात भीमाशंकर, कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, आजोबा डोंगररांगांमध्ये, माहुली, वासोटा, मेळघाट, ताडोबात शेकरू आढळतात. शेकरू हा अतिशय देखणा आहे. मात्र, तो झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलांत त्यांचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्यांची संख्या वाढली आहे. दाट लाल रंगाचा, आकर्षक, शेपटी असलेल्या शेकरूंच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात. कोरोनामुळे शेकरूंची नोंद करण्याचे काम काही अंशी झाले आहे. हरिश्चंद्रगड अभयारण्यात वापरातील व वापरात नसलेली 396 घरटी आढळली आहेत. एकूण 97 शेकरू या परिसरात असून कळसूबाई घाटघर परिसरात 17 शेकरू आहेत. तेथेही 43 घरटी आढळून आली. गतवर्षी प्राणी पक्षांसह अभयारण्य क्षेत्रात 280 प्राणी व 450 पक्षी आढळल्याची माहिती वनाधिकारी डीडी पडवळ यांनी दिली आहे.
हेही वाचा -मुंबईत मान्सूनची हजेरी; वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू