औरंगाबाद - भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान, कराड यांचा शपथविधी होत असताना, औरंगाबाद एक मोठा स्क्रिन लावण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच, यावेळी कराड यांच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास कार्यर्त्यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्याचा आढा घेताना इटीव्ही भारतचे औरंगाबाद प्रतिनिधी अमित फुटाणे कार्यालयासमोर शपथविधीचे थेट प्रक्षेपण
मंत्रिमंडळ विस्ताराच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी ढोल ताशे वाजवत डॉ. कराड यांच्यासह राज्यातील इतर मंत्र्यांना मिळालेल्या मंत्रीपदाबत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
डॉ. भागवत कराड यांची नुकतीच राज्यसभेचे खासदार म्हणून निवड करण्यात आली. डॉ. भागवत कराड दोन वेळेस औरंगाबादचे महापौर होते. त्यानंतर वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर खासदार म्हणून निवड झाल्याने, जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सर्व सामान्यांना संधी मिळाली असून, औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्न डॉ. कराड यांच्या रूपाने सुटतील असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.