अहमदनगर -घरावर आलेल्या संकटाच्या वेळी पळायचे नसून पाय रोवून उभे राहायचे असते. काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात आपण जनतेसाठी अवीरत काम करत आहोत. देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. तसेच मागील 35 वर्षाच्या अविश्रांत कामातून संगमनेर तालुक्याचा राज्यभर लौकिक निर्माण झाला असून हे प्रत्येक संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. राजहंस दुध संघाच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी आरशासमोर उभे राहावे, त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल - बाळासाहेब थोरात
संगमनेर तालुका सहदुध संघाच्यावतीने राजहंस महिला सबलीकरण योजने अंतर्गत आयोजित मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी कांचना थोरात होत्या. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख. दुर्गा तांबे उपस्थित होत्या.
हेही वाचा - काँग्रेसचा विचार घेऊन नव्या रक्ताची पिढी पुन्हा तयार होईल - बाळासाहेब थोरात
थोरात म्हणाले कि, देशाच्या विकासात महिलांचे मोठे स्थान आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांचा आदर्श महिलांपुढे आहे. आपला कारखाना, दुध संघ, विविध शैक्षणिक संस्था राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत. चांगल्या संस्था चांगले राजकारण याचा संबंध आपल्या परिवाराशी आहे. महिला माहेरी किंवा नातेवाईकांकडे जरी गेल्या तरी संगमनेर तालुका म्हणले कि, सन्मान मिळतो. 35 वर्ष सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत काम केले. कधीही विश्रांती घेतली नाही. तालुका हा आपला परिवार आहे. तालुक्यातील गोरगरीब शेतकरी, महिला यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले. आता अडचणीच्या काळात पक्षाने मला मोठी जबाबदारी दिली आहे. आपण महात्मा गांधी, काँग्रेस पक्ष, राज्यघटनेच्या विचारांशी प्रामाणिक आहोत. पक्षासाठी पाय रोवून काम करत आहोत. आता राज्याची जबाबदारी असल्याने तालुक्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडायची आहे. असे थोरात म्हणाले.
हेही वाचा - संगमनेर विधानसभा आढावा : विखे पाटील पाडणार थोरातांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?