अहमदनगर -कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा दररोज उद्रेक होत असताना बाधीतांचा आकडा 30 ते 60 च्या दरम्यान होता. मात्र आज बुधवारी एकाच दिवशी कोरोनाचा स्फोट झाल्यासारखे तब्बल 117 बाधीत रुग्ण आढळल्याने कोपरगाव तालुक्यात कोरोनाने नवा विक्रम केला आहे. आत्तापर्यंतचा सर्वाधिक बाधीत आकडा असल्याने कोपरगाव तालुका कोरोनाने हादरून गेला आहे. बुधवारी दिवसभरात तालुक्यातील 117 बाधीतापैकी 74 रुग्ण खासगी प्रयोग शाळेत तपासणी अंती निष्पन्न झाले. तर 36 अहमदनगरच्या शाससकीय प्रयोगशाळेत आणि 7 रॅपिड टेस्ट मध्ये आढळून आले आहेत.
320 रुग्णावर विविध ठिकाणी उपचार सुरु-
सध्या 320 रुग्णावर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. बुधवारी एकाच दिवशी शहरात 59 तर ग्रामीण भागात 59 रुग्ण बाधीत आढळले. त्यामुळे एकुण बाधीतांचा आकडा 3 हजार 315 वर गेला असुन आत्तापर्यंत 49 व्यक्तींचा कोरोनाने बळी गेला आहे. गेल्या आठवड्यापासून करोना बाधीतांचा आकडा वाढत आहे. नागरीक सर्वत्र खुलेआम फिरत असुन कोणतेही बंधन न पाळता स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालुन कोरोनाचा संसर्ग वाढवत असल्याची खंत वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने एकाच परिसरात अथवा गावात अधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यास तो परिसर सिल करण्यात येत असुन त्या भागातील प्रत्येक घरात जावून वैद्यकीय पथके नागीकांची तपासणी करीत आहे. घरोघरी जावून वैद्यकीय तपासणी केल्यामुळे कोरोना बाधीतांचा आकडा वाढला असला तरी कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होणार असल्याचं वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले आहे.