महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shevgaon Traders Business Stop: समाजकंटकांनी केलेल्या दंगलीविरुद्ध शेवगाव शहरात व्यापाऱ्यांची 'बंदची हाक' - traders have announced to stop their business

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी घडलेल्या दंगलीनंतर व्यापारी संघटनांनी बेमुदत बंद पुकारला आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी एकमुखाने घेतला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरही व्यापारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे शहरात शांतता पसरली आहे.

Shevgaon Traders Business Stop
व्यापाऱ्यांची 'बंदची हाक'

By

Published : May 16, 2023, 3:27 PM IST

Updated : May 16, 2023, 5:06 PM IST

व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदविषयी व्यापारी असोसिएशन अध्यक्षांची प्रतिक्रिया

अहमदनगर: छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीवर एका गटाने दगडफेक केली होती. त्यामुळे दंगल भडकली आणि दोन्ही बाजुने जोरदार दगकफेक, जाळपोळ झाली. यात चार पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही घटनास्थळी जाऊन संबंधित व्यक्तींवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. यानंतर पोलिसांनी 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत 31 हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांना न्यायालयात हजर केले असताना त्यांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

आरोपींना पकडून तुरुंगात घाला:व्यापाऱ्यांच्या बंद सोबतच व्यापारी मोर्चा काढणार होते; परंतु पोलिसांच्या आश्वासनानंतर मोर्चा रद्द करण्याचा निर्णय हा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तसेच उरलेल्या आरोपींना देखील लवकरात लवकर पकडून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन देखील व्यापाऱ्यांना दिल्याचे नितीन दहिवाळकर व्यापारी असोसिएशचे अध्यक्ष यांनी बोलताना सांगितले.

सकाळपासून या बंदची सुरुवात:या घडलेल्या घटनेमुळे शेवगाव शहरातील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. मंगळवार सकाळपासून या बंदची सुरुवात झाली. व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नाहीत. तसेच यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दोन गट आमने-सामने: अकोला जिल्ह्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात दोन गटात दगडफेकीची घटना शेवगावमध्ये घडली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीदरम्यान रात्री आठच्या सुमारास दगडफेक झाली. या दगडफेकीत बंदोबस्तावर असलेले चार पोलीस जखमी झाले आहेत. दोन्ही गटाने एकमेकावर दगडफेक केल्याचे आरोप केले आहेत. परिसरात तणाव वाढत असताना पोलिसांनी कारवाई करत परिस्थिती आटोक्यात आणली आहे. सध्या परिसरात शांतता आहे.

शेवगावमध्ये पोलीस बंदोबस्त: शांततेला सुरुंग लावणाऱ्या १०२ लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या २ तुकड्या शेवगावमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. अनियंत्रित झालेल्या जमावाने दुकानांचे आणि वाहनांचे नुकसान केले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेत चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शहरात सायंकाळी सुमारास मिरवणूक निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी होते. मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने एका गटाने दगडफेक केल्याची माहिती आहे. तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक करण्यात आली होती. अशा स्थितीत अफवा पसरल्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेक झाली. त्यामुळे सर्वांची एकच पळापळ झाली.

हेही वाचा:

  1. Trimbakeshwar Temple Nashik: त्र्यंबकेश्वर मंदिरात संदलची चादर नेल्याने गुन्हा दाखल; देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश
  2. Rahul Narwekar News : भरत गोगावलेंची पुन्हा नियुक्ती होऊ शकते -राहुल नार्वेकर
  3. Kalicharan Maharaj News: समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने कालीचरण महाराजांसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; भाजपने फेटाळले आरोप
Last Updated : May 16, 2023, 5:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details