शिर्डी: जवळील जवळके आणि धोंडेवाडी ही लागुन असलेली दोन गावे. त्यातील धोंडेवाडी गावातील नीम्मी वस्ती ही गायराण जमीनीवर अतिक्रमण करत वसली होती. त्यात सुमारे चारशे लोकसंख्या असलेली एकशे पत्तीस घरे होती त्यात अनेक बंगल्याचाही समावेष होता. अनेक वर्षा पासुन हे सगळे येथे गुण्या गोवींदाने राहत होते. मात्र गावातील पाझर तलावातील अधिग्रहीत जमीनीच्या विहीरी बाबतच वाद समोर आला. त्यात या विहीरी बुजविण्याची मागणी जोर धरु लागली. त्यात राजकारणही घुसले. तो वाद काही दिवस चालुन अखेर विहीरी बुजल्या गेल्या.
काहींनी स्वत:च हटवले अतिक्रमण
याच दरम्यान धोंडेवाडीतील निम्मी घरे गायराण जमीनीवर बांधलेली गेली असल्याने तीही काढावीवही मागणी पुढे आली यावर आधी हायकोर्टात नंतर सुप्रिम कोर्टात दावे दाखल झाले. यात न्यायालयाकडुन ही अतिक्रमणे काढण्या संदर्भात संबंधितांना नोटीस देण्यात आल्या होत्या त्याची अंतीम मुदत आजची होती. हे पाहून अनेक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून आपले सामान हलविण्यास काल पासुनच सुरुवात केली होता तर काही घरे आज बुलडोजर च्या साह्याने प्रशासनाने हटवली आहेत.