अहमदनगर -भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेता निवड बैठकीसाठी आज राज्यात येत असलेल्या केंद्रीय वरिष्ठ नेत्यांध्ये केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचाही समावेश आहे. दरम्यान, राज्यात येतच आहात तर परतीच्या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार उडवला असल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करा आणि तातडीने शेतकऱ्यांना मदत द्या असे आवाहन, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे. आपल्या फेसबुक पेजवरून तांबे यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना हे जाहीर आवाहन केले आहे.
राज्यात येतच आहात तर शेतकऱ्यांची मदत करा, सत्यजित तांबेंचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना आवाहन - Bharatiya Janata Party Legislature Leader Selection Meeting
दरम्यान, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून 'राज्यात येतच आहात तर परतीच्या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार उडवला आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करा आणि तातडीने शेतकऱ्यांना मदत द्या', असे आवाहन कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना केले आहे.
हेही वाचा - मुंबईत भाजप विधिमंडळ नेता निवड बैठक; काय असणार उद्धव ठाकरेंची भूमिका?
तांबे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, 'केंद्रात आपण कृषी मंत्री आहात हे ऐकून अतिशय आनंद झाला आहे. आता राज्यात काही कारणाने येणारच आहात तर, कृपया परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेट आपण द्यावी. त्यांना तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, ही हात जोडून व पाया पडून विनंती' त्याचबरोबर 'अन्यथा आंदोलनाचा मार्ग आमच्याकडे आहेच' असा इशाराही त्यांनी दिला आहे. आपल्या फेसबुक पोस्ट मधे तांबे यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे फोटोदेखील शेअर केले आहेत.