अहमदनगर - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्यांकडे पुरावे असतील तर त्यांनी मुंबई पोलिसांना दिले पाहिजे. उगाच कोण आले-गेले याची चर्चा करण्यापेक्षा त्यांनी ते पुरावे द्यावेत, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला दिले आहे. ते येथे माध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, भाजप या प्रकरणात बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करत आहे. यामुळे सुशांतला न्याय मिळणार आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. न्यायपालिका आपली प्रक्रिया पार पाडेल. मात्र, यानिमित्ताने मुंबई पोलिसांवर भाजपाने अविश्वास दाखवणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. तसेच पीएम फंडला भाजपा आमदारांनी आपला निधी दिला. आता मुंबई पोलिसांवर सुशांत प्रकरणावरुन आरोप होत आहेत. हा महाराष्ट्राशी दुजाभाव असल्याचा आरोपही रोहित यांनी यावेळी केला. -