प्रतिक्रिया देताना साईभक्त श्रीमती नागम अलीवेणी अहमदनगर: साईचरणी दान देणाऱ्या भक्तांची संख्या खूप आहे. 31 जानेवारी रोजी हैद्राबाद येथील साईभक्त श्रीमती नागम अलीवेणी यांनी त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ 233 ग्रॅम वजनाचे 12 लाख 17 हजार 425 रुपये किंमतीचे सुवर्ण कमळ साईबाबांना अर्पण केले आहे. हे कमळाचे फुल साईंना धूपारतीच्या वेळी चढवण्यात आले आहे. आपले दान साईबाबांना पावल्याचे समाधान भाविकाने व्यक्त केले आहे.
आकर्षक रेखीव काम केलेले फुल:अत्यंत सुबक कारागिरी आणि आकर्षक रेखीव काम केलेले हे फुल आहे. हे फुल हैद्राबादमध्येच तयार करण्यात आलेले आहे. भाविकाकडून साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात आलेले कमळ साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव यांनी स्विकारले आहे. भाविक नेहमी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांच्यावर साईबाबांचा आशिर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले. नववर्षाच्या प्रारंभदिनी एका भाविकाने साईबाबांना तब्बल 47 लाखांचा मुकूट अर्पण केला होता.
याआधी मिळालेले दान:कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील साईबाबा मंदीराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा 30 जानेवारीला अनेक संत महंताच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला होता. या वर्धापन दिनानिमित्त हैद्राबाद येथील साईभक्त किर्ती गोपीकृष्णन व एस. गोपीकृष्णन यांनी साईबाबा मुर्तीसाठी 7 लाख रुपये किंमतीचे गोल्डब्रासचे सिंहासन दान केले होते. या अगोदर त्यांनी मंदीरासाठी 5 लाख रूपये किंमतीची साईबाबांची मुर्ती दान केली होते. तर दुसऱ्या साईभक्त कल्पना आनंदजी यांनी मुर्तीसाठी चांदीचा टोप दान केला होता.
मागील वर्षी मिळालेले एकूण दान: २० ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर 2022 या पंधरा दिवसांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या पंधरा दिवसात भाविकांनी १७ कोटी ७७ लाख ५३ हजारांचे दान साईबाबांना अर्पण केल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली होती. दिपावली निमित्ताने अनंत अंबानी यांनी शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती करत पाद्य पूजा केली होती. यावेळी अनंत अंबानी यांनी साईबाबा संस्थानला 1 कोटी 51 लाख रुपायांची देणगी दिली होती, सदर देणगीचा धनादेश संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुपूर्त केला होता. यापूर्वीही नीता अंबानी यांनी शिर्डीला भेट देऊन साई संस्थांनला वेगवेगळ्या स्वरूपात देणगी दिली होती.
हेही वाचा: Pandharpur Wari 2023: माघ वारीसाठी पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी; भाविकांसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी