अहमदनगर- पती व त्याच्या नातेवाईकांनी पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवल्याचा धक्कादायक प्रकार नेवासे तालुक्यातील मोरेचिंचोरा येथे घडला आहे. पत्नीने अनैतिक संबंधास दिलेला नकार आणि मोबाईलमधील फोटो पाहिल्याच्या रागातून पतीने त्याच्या नातेवाईकांंच्या मदतीने हे दुष्कृत्य केल्याचे समजले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती शंकर दुर्गे त्याची आई व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी फरार आहेत.
मोबाईलमधील फोटो पाहिल्याच्या रागातून पतीने पत्नीला पेटवले; अहमदनगरमधील घटना - ahmadnagar
स्वाती शंकर दुर्गे असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेत भाजलेल्या स्वातीला अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तीनही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
![मोबाईलमधील फोटो पाहिल्याच्या रागातून पतीने पत्नीला पेटवले; अहमदनगरमधील घटना husband set wife on fire in ahmadnagar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6055777-thumbnail-3x2-op.jpg)
जखमी पत्नीचे छायाचित्र
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी
स्वाती शंकर दुर्गे असे यात गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेत भाजलेल्या स्वातीला अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तीनही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. युवतीवर पेट्रोल टाकून जाळण्याची हिंगणघाट येथील घटना ताजी असताना जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.