महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुखी संसाराला संशयाचे ग्रहण; चारित्र्यावरील संशयावरुन पत्नीला चाकूने भोसकून पतीनेही घेतला गळफास - पत्नीवर चाकूहल्ला

कैलास आपल्या पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता. यातून त्यांचे नेहमी वादावादी होत होती. शनिवारी रात्री कैलास व पत्नी अनिता यांच्यात चारित्र्याच्या संशयावरुन भांडण झाले. त्यानंतर त्याने . . . .

Murder
घटनास्थळी धाव घेतना पोलीस

By

Published : Apr 19, 2020, 7:53 PM IST

अहमदनगर- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला चाकूने भोसकून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही घटना शिर्डीतील संभाजीनगरात शनिवारी रात्री घडली. पत्नी जबर जखमी झाल्याने शेजारच्या नागरिकांनी तिला शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. कैलास दिवाकर ठोकळ असे पत्नीवर चाकूहल्ला करुन गळफास घेणाऱ्या पतीचे नाव आहे. तर अनिता ठोकळ असे जखमी पत्नीचे नाव आहे.

सुखी संसाराला संशयाचे ग्रहण; चारित्र्यावरील संशयावरुन पत्नीला चाकूने भोसकून पतीनेही घेतला गळफास
संभाजीनगरातील कैलास आणि त्यांची पत्नी अनिताचे नेहमी भांडण होत होते. कैलास आपल्या पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता. यातून त्यांचे नेहमी वादावादी होत होती. शनिवारी रात्री कैलास व पत्नी अनिता यांच्यात चारित्र्याच्या संशयावरुन भांडण झाले. आई-वडिलाचे भांडण सुरू असताना कैलासचा मुलगा चंद्रकांत हा आपल्या घर मालकाला बोलवण्यास जात होता. यावेळी कैलासने रागाच्या भरात चाकूने पत्नी अनितावर वार केले. चाकूने अनिताला भोसकल्यामुळे ती जबर जखमी होऊन खाली पडली. हे पाहताच कैलासने दोरीने आपला गळा आवळून स्वतःचे जीवन संपवले. पत्नी मात्र जबर जखमी झाल्याने चंद्रकांतने आरडाओरड केल्याने शेजारी जमा झाले. त्यांनी अनिताला शिर्डीतील श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणाचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत. संचारबंदी काळात ही घटना घडल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details