अहमदनगर- कौटुंबिक वादातून पत्नीविरुद्ध तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीने पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांनी सतर्कता दाखवित तात्काळ आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. या व्यक्तीला उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी दुपारी ४ वाजता घडली असून अबूबकर हबीन (रा. बागवान गल्ली) असे त्याचे नाव आहे.
कौटुंबिक वाद पोहोचला पोलीस ठाण्यात, पतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले पेटवून - पोलीस ठाणे
शहरातील बागवान गल्लीतील अबुबकर हबीन याचे अनेक दिवसांपासून पत्नीसोबत वाद सुरू आहेत. पत्नी-पत्नी एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे तक्रार अर्ज दोघांनीह पोलीस ठाण्यात दाखल केले आहे.

शहरातील बागवान गल्लीतील अबुबकर हबीन याचे अनेक दिवसांपासून पत्नीसोबत वाद सुरू आहेत. पत्नी-पत्नी एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे तक्रार अर्ज दोघांनीह पोलीस ठाण्यात दाखल केले आहे. तर अबुबकर हबीनचारित्र्याची बदनामी करत असल्याचे त्याच्या पत्नीने म्हटले आहे. वैयक्तिक स्वरूपाच्या आरोपाबाबत कुठलेही पुरावे नसल्याने व कौटुंबिक वादात काय कारवाई करायची, असा प्रश्न पोलिसांना पडला होता.
अबुबकर कुठलीही पूर्वसूचना न देता आज दुपारी चार वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आला. अंगावर रॉकेल ओतून घेत त्याने काडीपेटीने पेटवून घेतले. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अबुबकर याला उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.