पारनेर तालुक्यात आढळला भुकेने व्याकुळ बिबट्या - News about Leopard
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सज्जनवाडी या गावात भुकेने व्याकुळ झालेला बिबट्या आढळला. या बाबत वन विभागाशी अनेक वेळा संपर्क करूनही कोणीच कर्मचारी त्याठिकाणी पाहण्यासाठी आले नाहीत.
पारनेर तालुक्यात आढळला भुकेने व्याकुळ बिबट्या
अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सज्जनवाडी राधे या खेडेगावात एक बिबट्या ग्रामस्थांना दिसला, मात्र हा बिबट्या भुकेने व्याकूळ आणि क्षीण अवस्थेत होता. त्याची चाल सुद्धा मंदावलेली होती. त्याची अवस्था फारच दयनीय होती. याबाबत ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांना संपर्क करूनही वनविभाचे कुणीही कर्मचारी त्याठिकाणी पाहण्यासाठी आले नाहीत. अनेकदा फोन करूनही वनाधिकारी न आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.