अहमदनगर- शिर्डीजवळील नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या हॉटेल ग्रीन पार्कमध्ये शिरून काही गुंडांनी ७० हजार रुपयांची रोकड लपास केली आहे. यावेळी गुंडांनी हॉटेलातील सामानाची तोडफोड केली असून यात हॉटेल मालकाचे सुमारे दोन लाखांच्यावर नुकसान झाले आहे.
शिर्डीत हॉटेलची तोडफोड; तीन आरोपी जेरबंद, एक फरार - Shirdi Hotel Green Park Sameer Kadoo News
शिर्डी जवळील नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या हॉटेल ग्रीन पार्कमध्ये शिरून काही गुंडांनी ७० हजार रुपयांची रोकड लपास केली आहे. यावेळी गुंडांनी हॉटेलातील सामानाची तोडफोड केली असून यात हॉटेल मालकाचे सुमारे दोन लाखांच्यावर नुकसान झाले आहे.
![शिर्डीत हॉटेलची तोडफोड; तीन आरोपी जेरबंद, एक फरार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4897014-thumbnail-3x2-op.jpg)
शिर्डीजवळ असलेल्या तीसगाव येथील नगर-मनमाड महामार्गावर हॉटेल ग्रीन पार्क आहे. हॉटेलचे मालक समीर कडू रात्री हॉटेल बंद करत असताना अचानक तीन ते चार लोक हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी हॉटेलमध्ये तोडफोड सुरू केली. तसेच, हॉटेलमधील वेटर आणि कॅशरला बेदम मारहाण करत ७० हजार रुपये आणि लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेली सोन्याची माळ घेऊन फरार झाले. या प्रकरणी हॉटेल मालक कडू यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात लोणी पोलिसांनी चार आरोपींवर गुन्हा दाखल करत यातील तीन आरोपींना गजाआड करण्यात यश आले आहे. त्याचबरोबर, फरार एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती लोणी पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा-लक्ष्मीपूजनादिवशी शिर्डीच्या साईमंदिरात मोठा उत्सव, दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी