महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवगड यात्रेत थिरकले अश्व, राज्यातील अश्वांचा सहभाग - देवगड यात्रा अहमदनगर

देवगड यात्रेत विविध जातींच्या घोड्यांचे प्रदर्शन आणि नृत्य स्पर्धेमुळे या यात्रेचा नावलौकीक राज्यभर पसरत आहे. या यात्रेत अश्वांनी ठेका धरला आणि बेभान अश्वांच्या नृत्याविष्कारने बघ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

स्पर्धेत नृत्य करताना अश्व

By

Published : Feb 19, 2019, 9:16 PM IST

अहमदनगर -जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात देवगड येथे माघ पौर्णिमेनिमित्त खंडेरायाची यात्रा सुरू झाली आहे. त्यानिमित्त याठिकाणी अश्वनृत्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या अश्वांनी सहभाग घेतला.

स्पर्धेत नृत्य करताना अश्व

अकलुज, सारंखेडा, शिरपूर अश्व प्रदर्शनानंतर देवगड येथे भरणारे अश्व प्रदर्शन लौकिक मिळवत आहे. आजच्या प्रदर्शनासाठी देशभरातील अश्व मालकांनी सहभाग नोंदवला होता. वेगवेगळ्या अश्‍वांच्या जाती, त्यांचे नृत्य हे सर्वांसाठी आनंददायी ठरत आहे. दरम्यान अश्वांना शिकवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या अश्वमालकांचीही प्रेक्षकांनी स्तुती केली. आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे या अश्वांचा सांभाळ केल्यानंतर अश्व मालकाचे नाव मोठे करतात. त्यावेळी मालकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा असतो.

स्पर्धेची माहिती देताना आयोजक
देवगड येथील खंडोबाचे मंदीर प्रतीजेजुरी म्हणून ओळखले जाते. अश्व खंडोबाचे वाहन असल्याने येथे आलेल्या अश्‍वांना पाहण्यासाठी खंडोबा भक्तांनी गर्दी केली होती. यावर्षी आयोजकांनी पहिल्या क्रमांकास ३१ हजार, द्वितीय क्रमांकास २१ हजार आणि तृतीय क्रमांकास ११ हजाराचे बक्षीस दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details