अहमदनगर -राहाता शहरातील आठवडी बाजारात सोरटचा खेळ चालवणाऱया गुंडाकडून पोलिसालाच मारहाण करण्यात आली आहे. शहरात गुडगीरी वाढल्याने नागरीक सुरक्षीत नव्हतेच आता पोलिसालाच गुडांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अहमदनगरच्या आठवडी बाजारात सोरटचा खेळ, कारवाईसाठी आलेल्या पोलिसाला गुंडांकडून मारहाण - राहता शहर
यावेळी बेदम मारहाण होत असतानाही पोलिसाने रक्तबंबाळ अवस्थेतही एका गुंडाला पकडून ठेवले होते. मुख्य आरोपी विकी चावरेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुळे पोलिसाच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.
गुरुवारी राहात्याचा आठवडी बाजार असल्याने आसपासच्या गावातील लोक बाजारासाठी येत असतात. यातील विटभट्टी मजुर रामनरेश केवड यांचे पैसे लुबाडून त्याला मारहाण केली होती. या घटनेची माहिती मिळताच बाजारतळावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसालाच सोरट चालविणाऱ्या विकी चावरे आणि त्याच्या साथिदारांनी मारहाण केली. मारहाण झालेल्या पोलिसाचे नाव सुनिल मालणकर आहे. परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीत ही मारहाणीची घटना कैद झाली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या दोघांनाही उपचारासाठी शिर्डी रुग्णालयात उपचारकरता दाखल करण्यात आले आहे.
यावेळी बेदम मारहाण होत असतानाही पोलिसाने रक्तबंबाळ अवस्थेतही एका गुंडाला पकडून ठेवले होते. मुख्य आरोपी विकी चावरेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुळे पोलिसाच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. मात्र, खाकीवर्दीने अवैध्य व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्यानेच आज ही परस्थिती ओढवल्याची चर्चा होत आहे.