अहमदनगर - जिल्ह्यात पुन्हा एकदा हनी ट्रॅपचा ( Honeytrap Case ) प्रकार समोर आला आहे. एका श्रीमंत बागायतदाराकडून उसनवारी घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने बोलवत महिलेने अश्लिल व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर बागायतदाराला लाखोंनी लुटत ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना शिर्डीत ( Honeytrap Case in Shirdi ) घडली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेस ताब्यात घेतले आहे. तर त्यानंतर दुसऱ्या आरोपीसही अटक करण्यात आली आहे.
Honeytrap Case in Shirdi : शिर्डीमध्ये 40 लाखांचा हनीट्रॅप - अहमदनगर
अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यात पुन्हा एकदा हनी ट्रॅपचा ( Honeytrap Case ) प्रकार समोर आला आहे. एका श्रीमंत बागायतदाराकडून उसनवारी घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने बोलवत महिलेने अश्लिल व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर बागायतदाराला लाखोंनी लुटत ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना शिर्डीत ( Honeytrap Case in Shirdi ) घडली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेस ताब्यात घेतले आहे. तर त्यानंतर दुसऱ्या आरोपीसही अटक करण्यात आली आहे.
अखेर बागायतदाराची पोलिसांत धाव -आरोपी महिलेने चार लाख रुपयांची आणखी मागणी केल्याने पीडित बागायतदाराने पोलिसात धाव घेतली. तिथे त्याने सर्व प्रकार सांगत तक्रार अर्ज दाखल केला. शिर्डी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत खात्री करण्यासाठी प्री ट्रॅप पंचनामा तयार केला. पन्नास हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणि बंडलच्या खाली साधे कागद असे चार लाख रुपये तयार केले. शिर्डीतील हॉस्पिटल रोडवर पैसे घेण्यासाठी महिलेला बोलावले. संबंधित महिला घटनास्थळी आली तेव्हा ट्रॅप लावून पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटल येथील रोडच्या कडेला पोलिसांनी सापळा रचला. तसेच फिर्यादी चार लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी पोहचला. महिलेने ते सर्व पैसे ताब्यात घेत आखणी 40 लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले तर हे सर्व प्रकरण मिटेल आणि व्हिडिओ आणि फोटो परत करु, असे म्हटले. त्याचवेळी पोलिसांनी आरोपी महिलेस सरकारी पंचासमोर ताब्यात घेतले. तर त्यानंतर शोधाशोध करुन दुसरा आरोपी राजेंद्र गिरी याला देखील अटक करण्यात आली.
हेही वाचा -Uddhav Thackeray : राष्ट्रपतीपद निवडणूक.. ममता बॅनर्जींची बैठक.. उद्धव ठाकरे फिरवणार पाठ