अहमदनगर -राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil talk on aryan khan) यांनी आर्यन खानवर प्रतिक्रिया दिली. न्यायालयाचा निकाल मी वाचलेला नाही, मात्र जे अहवाल आले आहेत त्याच्यामधून जर न्यायालयाने आर्यन खानची (aryan khan) निर्दोष सुटका केली असेल किंवा तशा प्रकारचे विचार व्यक्त केले असतील तर, हे सिद्ध होते की तो निर्दोष आहे. त्याचबरोबर, या प्रकरणात जर एनसीबीने षडयंत्र केले असले तर, त्याबाबतची माहिती तपासातून पुढे येईल, असे मत दिलीप वळसे - पाटील यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -अभिनेत्री कंगनाची स्वातंत्र चळवळीवर बोलण्याची लायकी आहे का? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात....
क्रूझ ड्रग पार्टी (Cruise Drug Case) प्रकरणात आर्यन खानकडे (Aryan Khan) ड्रग्ज सापडले नाहीत. त्याच्या वॉट्सअॅप चॅटमध्ये कट कारस्थान करण्याचा हेतू असल्याचे आढळून आले नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) म्हटले आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनी सदर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचबरोबर, केंद्र सरकार राष्ट्रीय तपास यंत्रणेचा चुकीचा वापर करत असल्याचे मतही गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी व्यक्त केले.