अहमदनगर (शिर्डी)- आज शिर्डीत साईबाबांच्या गुरूस्थान मंदिरासमोर पारंपारिक पद्धतीने होळीचे पुजन करून दहन करण्यात आले. तसेच पालथ्या हाताने शंखध्वनी अर्थात बोंब मारत मनातील अनिष्ठ प्रवृत्ती शांत होवो, अशी प्रार्थना साईबाबा संस्थान आणि भक्तांनी साईबाबांच्या चरणी केली.
होळीचा सण हा आज देशभरात कोरोनाच्या सावटाखाली साजरा केला जात आहे. साईबाबांच्या मंदिरातही मोजक्याच भाविकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होळी साजरी करण्यात आली. साईबाबांच्या शिर्डीतही साईबाबांच्या काळापासुन होळी पुजन करून दहन केले जाते. आज साई मंदिरा जवळील गुरूस्थान मंदिरासमोर एरंड, फुलांची माळ, ऊस आणि पाच गौऱ्या मध्ये उभ्या करून होळीला तयार करण्यात आले व मध्यान्ह आरतीच्या आधी संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते होळीच पुजन करून दहन केले गेले.
साई मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा; मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडली पूजा - शिर्डीत होळी पूजा
आज साई मंदिरा जवळील गुरूस्थान मंदिरासमोर एरंड, फुलांची माळ, ऊस आणि पाच गौऱ्या मध्ये उभ्या करून होळीला तयार करण्यात आले व मध्यान्ह आरतीच्या आधी संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते होळीच पुजन करून दहन केले गेले.
होळीची पूजा